पंढरपूर : नीरा देवघर धरणाबरोबरच आता उजनीचं पाणी चोरण्याचा डाव बारामती आणि इंदापूरकरांनी आखला आहे. पण, त्यांचा हा डाव उधळवून लावू, असा इशारा माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मंगळवारी (ता. २७ एप्रिल) ‘सरकारनामा’शी बोलताना दिला. उजनी धरणातून इंदापूर तालुक्यासाठी 5 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने नुकताच घेतला आहे. या निर्णयावरुन सोलापूर जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात विविध शेतकरी संघटनांबरोबरच आता सर्वच पक्षांच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत विरोध केला आहे. यामध्ये आता भारतीय जनता पक्षाचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनीही उडी घेत थेट बारामतीकरांवर निशाना साधला आहे.
#Pandharpur #Ranjitshinhnaiknimbalkar
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics